Friday, August 3, 2018

कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का? जाणून घ्या…

कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखता येते का? जाणून घ्या…
अनेकदा असं होतं की भावनांच्या भरात आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि नंतर त्याचा परिणाम भोगावा लागतो. सेक्सचं देखील असचं आहे. प्रेमभावनेत वाहत गेल्याने आपल्याला अनेकदा सुरक्षेचा विसर पडतो आणि मग त्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आजकाल सर्वच कपल त्यांना कधी आई-वडील व्हायचं आहे ह्याचं प्लानिंग करतात. म्हणजे जर नुकतचं लग्न झालेलं असेलं, किंवा दोघेही जॉब करत असतील, किंवा सध्या आई-वडील ही जबाबदारी स्वीकारण्याची तयार नसेल, अशी सर्व कारणे त्या प्लानिंग मागे असतात.
मग त्यासाठी शरीर संबंध बनविताना अनेक जोडपे कदाचित कंडोमचा वापर करत असतील. पण कधी-कधी भावनांच्या भरात आपल्याला कंडोमचा विसर पडतो आणि मनाची काहीच तयारी नसताना आपल्याला पालकत्व स्वीकाराव लागतं. आणि मग त्यातून पती-पत्नीच्या नात्यातील ताणताणाव, दुरावा हे सर्व घडून येतं.

हे सर्व होण्यापेक्षा तयारी नसताना गर्भधारणा होऊच न देणे हाच सर्वात उत्तम मार्ग. पण तुम्हाला हे माहित आहे का की, तुम्ही कंडोमचा वापर न करता देखील गर्भधारणा रोखू शकता? होय कंडोम व्यतिरिक्त इतर अनेक असे उपाय आहेत ज्याने तुम्ही गर्भधारणा रोखू शकता आणि आपले जीवन हवे तसे जगू शकता.

बर्थ कंट्रोल पॅच

हा एका प्रकारचा पॅच असतो, ज्याला स्त्रिया आपल्या शरीराला चिटकवू शकतात. हा Estrogen आणि Progestin हार्मोन्सना रिलीज करून प्रेग्नसीला थांबवतो. योग्य प्रकारे वापरल्यास ही पद्धत ९९% यशस्वी ठरू शकते. पण ह्याला वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Birth control implant

हा काडीपेटीच्या काढीएवढ्या आकाराचा रॉड असतो. ह्याला स्त्रीच्या शरीरात इम्प्लांट केले जाते. हा देखील हार्मोन्सना रिलीज करून गर्भधारणा होण्यापासून थांबवतो. Birth control implant ४ वर्षांपर्यंत काम करते. तरी ह्याचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा.

Spermicides

हे देखील एक प्रकारे गर्भनिरोधक म्हणून काम करते. जे पुरुषाच्या वीर्यला अंडाशयापर्यंत पोहोचू देत नाही. ह्याचा वापर सेक्सपुर्वी केला जातो. पण ह्याचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

सुरक्षित आठवडा
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसानंतरच्या ८ व्या दिवसापासून ते २० व्या दिवसापर्यंतचा काळ हा सेक्स साठी सुरक्षित काळ मानला जातो.

पुल अॅण्ड प्री मैथड
जर तुम्ही सेक्स करतानाच्या शेवटच्या क्षणांत स्वतःवर नियंत्रण ठेवून आपल्या साथीदारापासून दूर होऊ शकत असाल तर ह्या पद्धतीने देखील गर्भधारणेला थांबवले जाऊ शकते. आणि ह्यासाठी तुम्हाला न कंडोमची गरज ना कुठल्या इतर गोष्टीची. तसेच ह्याचा सक्सेस रेट हा देखील कंडोम इतकाच आहे. ह्या पद्धतीचा सक्सेस रेट हा ८३% आहे तर कंडोमचा ८४%.

IUCD मेथड

आजकाल IUCD ही पद्धती स्त्रिया जास्तकरून वापरतात. ह्याला डॉक्टरकडून स्त्रियांच्या शरीरात इम्प्लांट केले जाते, ज्यामुळे गर्भधारणा थांबवता येते. तुम्ही ह्याला आपल्या सुविधेनुसार काढू देखील शकता.

गर्भनिरोधक गोळ्या
तुम्ही गर्भधारणा थांबविण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा देखील वापर करू शकता. पण ह्या गोळ्या घेतल्याने हार्मोनल असंतुलन होऊ शकते. त्यामुळे ह्यांचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.

कंडोम वापरण्यात अडचणी असतील तर यापैकी काही सोयीच्या पद्धती वापरून तुम्ही अनपेक्षित संततीप्राप्ती थांबवू शकता.

आमचे इतर लेख वाचण्याकरिता क्लिक करा  yzstories.blogspot.com

संभोगवेड्या माणसांसाठी संभोगतील आनंद कसा घ्यावा व द्यावा

संभोग करताना कराव्यात काही गोष्टी
प्रणय किंवा इंग्रजीमधल्या लोकप्रिय नावाने संपूर्ण जगात प्रसिद्ध असणारा “सेक्स” ही तसं पाहायला गेलं तर मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. निखळ आनंद देणारी, दोन व्यक्तींमधील नाते फुलवणारी, प्रेमाचे नाते अधिक घट्ट करणारी. तरीही जिथे शारीरिक संबंधांचा प्रश्न येतो तिथे बऱ्याच गोष्टींपासून प्रेमीजन अनभिज्ञ असतात.तरीही अनेकदा याच कारणावरून जोडप्यांमध्ये भांडणे होत राहतात. सेक्समधला विसंवाद हा घटस्फोटाचे कारण देखील बनतो.याच्या मुळाशी जावून पाहिलं तर फक्त hardcore sex आणि love making या दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्यामधील फरक अनेक जोडप्यांना न समजल्या मुळे तो त्यांच्यातील विसंवादाचं कारण बनतो. जाणून घेवू या सेक्स च्या काही अशाच अनाभिज्ञ पैलूंबद्दल..

सेक्स करण्याच्या आवडीनिवडी व्यक्ती परत्वे भिन्न असतात. आपल्या पार्टनर बरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवायचे आणि ते फुलवायचे हा सर्वस्वी जोडप्यांच्या संमतीचा भाग असतो.

१. स्वत:च्या जोडीदाराला समजून घ्या :


स्वत:ला आणि स्वत:च्या जोडीदाराला समजून घेणे, त्याच्या शारीरिक बाबींचा विचार करणे, शारीरिक संबंध बनवताना जोडीदाराच्या इच्छेचा विचार करणे, स्त्री जोडीदाराला फुलवणे, शृंगार करणे या गोष्टी प्रेम फुलवण्यास मदत करीत असतात.

शरीराचं मिलन हे केवळ फक्त शारीरिक पातळीपर्यंत मर्यादित नसतं. माणूस आणि पशु मध्ये हा एक महत्वाचा भेद राहतो. पशु हे केवळ निसर्गानियमा नुसार प्रजाती वाढवण्यासाठी ते ही विशिष्ट मौसमात त्यांच्या शारीरिक क्रीडा करतात. माणसाच्या बाबतीत हीच गोष्ट सर्वस्वी भिन्न राहते.शारीरिक संबंधात स्त्री च्या मनाचा विचार करणे आवश्यक ठरते कारण तिला केवळ लैंगिक कृतीपेक्षा प्रेम, सहवास, स्पर्श या गोष्टींची भूक असते. तिला फुलविल्या विना केवळ स्वत:च्या सुखाचा विचार जिथे केला जातो तिथे शारीरिक संबंध प्रणयक्रीडा न राहता फक्त एक बळजबरी होवून जाते.
असा प्रणय निव्वळ उपभोग बनून जातो ज्याचा आनंद फार काळ टिकत नाही आणि त्यातून प्रेमाचा बंध ही निर्माण होत नाही.


२. दोघांमधील कनेक्शन :

शरीर संबंध करणाऱ्या दोन व्यक्तीमध्ये प्रेम असेल, त्यांची केमिस्ट्री जुळलेली असेल तरच तृप्ततेचा अथवा पूर्णत्वाचा आनंद मिळतो.
खरे पाहता प्रणय क्रीडे मध्ये ज्याला peak-point किंवा orgasm असं म्हटलं जातं, तो एक छोटा हिस्सा असतो. बऱ्याचदा हे लोकांच्या लक्षात येत नाही.
केवळ फक्त तृप्ती मिळवण्यासाठी केला जाणारा शरीरसंबंध हा खूप वेळा मानसिक दरीच कारण बनतो. शरीरसंबंधा मध्ये एकमेकांसाठी दिला जाणारा वेळ, स्पर्श, एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घेण्याची मानसिकता या गोष्टी तृप्ती होण्यासाठी आवश्यक असतात.या गोष्टींचा जर अभाव असेल आणि फक्त एक pick point मिळवण्याच्या हेतूने प्रणयाच्या नावाखाली यांत्रिक क्रिया केली जात असेल तर अशा संबंधामधून प्रेम वाढीस लागत नाही.

३. चुंबन

चुंबन क्रिया प्रणया मधील आनंद आणि गोडवा वाढवते त्यामुळे ही पायरी वजा न करता हर एक जोडप्याने स्वत:चा आणि स्वत:च्या जोडीदाराचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी केली पाहिजे.
खर तर हा शारीरिक संबंध फुलवण्याच्या प्रक्रियेमधला महत्वाचा भाग असतो. जी जोडपी प्रेमात असतात किंवा प्रेमात पडलेली असतात त्यांच्यामधील प्रेम फुलवण्यासाठी चुंबन ही पहिली पायरी असते. प्रणयक्रीडे मध्ये चुंबनाचे अनन्यसाधारण महत्व आहे.खूप वेळा जोडप्यांना किंवा जोडप्यामधील कुणाही एकाला यामध्ये रस नसतो. याची करणे वेगवेगळी असू शकतात. मात्र प्रेमात आणि संबंधामध्ये अनेक अशा गोष्टी असतात ज्याला पहिल्या प्रथम जोडीदाराची संमती नसते पण अशा गोष्टी केल्या तर एकमेकांमधील प्रेम फुलण्यासाठी मदत होवू शकते.

४. प्रणया नंतरची उत्तरक्रिया :


हा सगळ्यात दुर्लक्षित राहिलेला भाग. बऱ्याचदा शरीरसंबंधामध्ये आपली इच्छा पूर्ण झाल्यानंतर पुरुष समाधानी होवून झोपी जातो. बऱ्याचदा अशा वेळी स्त्रीला पुरुषाने आपल्याला असे तटकन तोडून टाकावे या गोष्टीचा कुठेतरी राग येत राहतो.प्रणया नंतरच्या उत्तरक्रिये मध्ये आपल्या जोडीदाराबरोबर हितगुज करणे, त्याच्याशी बोलणे, त्याला कुरवाळणे, कुशीत घेवून झोपणे अशा गोष्टी शरीरसंबंधा मधील रंगत वाढवतात. प्रेम वाढवतात.
अशा रीतीने जोडप्यांना शरीरसंबध हे केवळ एक शारीरिक क्रिया अथवा उपभोगाचा प्रकार न राहता त्याला संस्मरणीय प्रणय क्रीडा बनवायचे असेल तर वर दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवून त्याचा अंमल करावयास हरकत नाही.

Thursday, August 2, 2018

एका नव-याने मांडलेलं मत


पिरेड अर्थात मासिक पाळी आली की आई, चुलत्या आणि घरातल्या, गल्लीतल्या बायका लांब बसायच्या. आम्ही लहान पोरं त्यांच्याकडे गेलो की, 'अय तिकडं लांब खेळा, शिवू नका' अशा सुचनावजा धमक्या मिळायच्या. चुकून कधी शिवलचं तर घरात बापाकडून किंवा अन्य पुरुषाकडून मार बसायचा. मग आईला विचारायचो ' आय, का गं, शिवायचं नाही' तर आई कावळ्याने शिवलय, देवाने सांगितलंय अशी कारणं सांगून दूर राहायला सांगायची. एखाद्यावेळी शिवलं तर गाईच्या पाया पडायला लावायची. लहान लेकराला माफ असतंय म्हणून कुशीत घेऊन झोपायची. तिला 4 दिवस पाणी, जेवण आणि सगळंच लांबून मिळायचं. भांडी घासणे, कपडे धुणे अशी कामे मात्र तिने केली तरी चालायची. म्हणजे त्या चार दिवसात तिच्याकडे हे अधिकच काम वाढायच. तिची या चार दिवसातली कपडे वेगळी असायची, जी तिला पाचव्या दिवशी धुवून टाकावी लागायची. आई, घरात कुणी नसताना पाय चेपून दे म्हणायची तर आम्ही खेळायला पळून जायचो. मात्र या अजाणत्या वयात अशिक्षितपणामुळे एकही जाणता पुरुष अथवा स्त्री भेटली नाही की जो 'चार दिवसाचं' महत्व आणि त्रास समजावून सांगेल.
बरंच मोठं होईपर्यंत ही चार दिवसाची भानगड कळाली नाही. मग कॉलेजवयात काही मैत्रिणी आणि प्रेमात पडल्यावर प्रेयसी अर्थात बायकोकडून ही भानगड नेमकी काय असते ते समजलं. शिक्षित आणि खुल्या विचारांच्या काही मैत्रिणी यावर भरभरून बोलायच्या तेंव्हा 'पिरेड' समजू लागला. मात्र त्यांच्या बोलल्याने त्याची तीव्रता कळाली नाही. प्रेमात पडल्यावर म्हणजे बायकोशी मुक्तपणे बोलायला लागल्यावर ह्या दिवसांची तीव्रता आणि त्रास समजायला लागला. तिला त्रास व्हायला लागल्यावर ती ढसाढसा रडायची, तेव्हा दूर असल्याने मी काहीच करू शकत नसायचो, त्यावेळी पुरुष असण्याची लाज वाटायची.

आज, मात्र ह्या गोष्टीला आम्ही आनंदाने जगतो. मी स्वतः तिला दुकानातून काळ्या पिशवीत न घालता सॅनिटरी नॅपकिन आणून देतो. खरतर चार दिवस हे नावाला असतात. मात्र पाळी येण्याच्या आधी दोन दिवस, पाळीचे चार दिवस त्रास आणि त्यांनंतरचे दोन-तीन दिवस अशक्तपणा या गोष्टीचा सामना महिलांना करावा लागतो. या चार दिवसात पहिल्या दोन दिवस त्यांना फार त्रास होतो. यावेळी त्यांना जवळीकीची आणि प्रेमाची गरज असते. प्रेमाने बोलणारे, मायेचे शब्द हवे असतात. यावेळी हातपायाचा गळाटा झाल्याने हातपाय चेपून देण्याची गरज असते.

आपण शिक्षित आहोत म्हणून या अपेक्षा आपण नक्की पूर्ण करू शकतो. अभिमानाने सांगत नाही मात्र, मी या चार दिवसात घरातलं जास्तीत जास्त काम करतो आणि तिचा ताण कमी करतो. (तसं मी रोजच लागेल ती मदत तिला घरकामात करतो) हा काळ फार नाजूक असतो. या नाजूक काळात बायकांचे मूड सेन्स बदलतात यामुळे चिडचिड, राग, रडणे या गोष्टी अचानक होतात. यामुळे आपण न चिडता त्यांच्या भावना समजून घेऊन प्रेमाने वागणे महत्वाचे असते. तिच्यासाठी कॅडबरी, आईस्क्रीम अशा छोट्या-छोट्या गोष्टी आणतो. तिला चहा करून देतो. अंग चेपून देतो. दोघेच असल्याने तिला आवडणारे खिचडी, ऑम्लेट, अंडामॅगी अशा गोष्टी ऑफिसवरून आल्यावर करून देतो. अर्थात हे तिच्या त्रासापेक्षा फार मामुली आहे. कसय या गोष्टींनी विशेष काही फरक नाही पडत. मात्र त्यांचा त्रास कमी होतो आणि आपल्यावर दुपटीने प्रेम करतात ह्या बायका. फार हळव्या असतात हो बायका. आपल्या अनेक चुकांना ह्या प्रेमामुळे कुणी पदरातनाही घेतलं तर त्या नक्की घेतात. नाहीतरी पुरुषत्वासारख्या भिकार गोष्टीशिवाय आपल्याकडं विशेष आहे तरी काय? त्यामुळे हे संपवू, नाही संपलं तर कमी तरी करूच.

Sunday, July 29, 2018

बाजीराव मस्तानी भाग-8 कर्तबगारी व मृत्यू

कर्तबगारी 

•    पुण्यातील शनिवारवाडा महाल किल्ला, पेशवा शासन कर्त्यांचे  मराठा साम्राज्यातील आसन , याची कामगिरी बाजीरावांकडे सोपविली गेली होती.
•    बाजीरावांचा, ज्यांनी ४१ मोठी युद्धे आणि अनेक इतर युद्धे लढली, कधी हि पराभूत न झाल्याचा लौकिक आहे.
•    वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून , तुकड्यांमध्ये विभाजित झालेल्या मुघल साम्राज्याचा दुबळेपणा समजून घेणारे आणि त्याचा फायदा करून घेणारे ते पहिलेच होते. साम्राज्याच्या राज दरबारामध्ये सय्यद बांधवांचा ढळता प्रभाव हा , बाजीरावांच्या हल्ल्यांच्या निर्णयासाठी आणखी एक प्रभावी कारणीभूत घटक ठरला.
•    अनेक  भागांमध्ये  तुकडे झालेल्या मुघल साम्राज्या वर  सूड घेऊन नाश केल्या नंतर सिंधीयांची (राणोजी शिंदे )ग्वालियर येथील राज्य सत्ता, इंदोर चे होळकर (मल्हारराव ), बडोद्याचे गायकवाड (पिलाजी ), आणि धार चे पवार (उदाजी ) यांची निर्मिती मराठा साम्राज्याचा एक भाग म्हणून बाजीरावांनी केली. 
•    १७२८ मध्ये त्यांनी, त्यांचे मूळ सासवड वरून आणि मराठ्यांची प्रशासकीय राजधानी सातारा वरून पुण्याला हलविली. या प्रक्रिये दरम्यान त्यांनी कसब्याचे एका मोठ्या शहराच्या पायामध्ये रुपांतर केले. त्यांचे सेनापती, बापुजी श्रीपत , यांनी सातारच्या काही बड्या प्रतिष्ठित  कुटुंबाना गळ घालून पुणे शहरामध्ये स्थलांतरित होऊन स्थायिक केले, जी नंतर अठरा पेठेंमध्ये (नगरांमध्ये ) विभाजित करण्यात आली.
•    १७३२ मध्ये , महाराज छत्रसाल यांच्या मृत्युनंतर , मराठा साम्राज्याचे दीर्घ काळा चे घटक असलेल्या, बाजीरावांना बुंदेलखंड मध्ये छत्रसालाच्या प्रांतातील एक तृतीयांश भाग मंजूर करण्यात आला.
•    घोडदळा चे अतिशय कर्तबगार सरदार, असलेल्या बाजीरावांवर त्यांच्या सैन्य दलानि आणि लोकांनी भरभरून प्रेम केले. असे मानले जाते कि बाजीराव हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी लढले आणि मुघलांना उत्तर भारतावर नजर रोवण्या आधी , मध्य आणि पश्चिम भारतातून कायमचे हुसकावून लावले. त्यांच्या नेतृत्वाखाली , मराठ्यांनी सिद्दी (मोघुल नौसेना अधिकारी  ), मुघल, पोर्तुगीज , निझाम , बंगश आणि इतर अनेकांना पराभूत केले. 
•    १९ व्या शतकातील ब्रिटीशांच्या सत्ता स्थापनेपूर्वी , संपूर्ण  १८ व्या शतकासाठी उप - खंडा मध्ये वर्चस्व  गाजविणार्या मराठा साम्राज्याची उभारणी करण्याकरिता शिवाजी महाराजां नंतर बाजीराव हे एक महत्वाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

मृत्यू 

बाजीरावांचा मृत्यू सत्तेमध्ये असतानाच २८ एप्रिल, १७४० मध्ये झाला. जहागीरीची पाहणी करताना , वयाच्या ३९ व्या वर्षी अचानक आलेल्या तापि मुळे , शक्यतो उष्माघात झाल्यामुळे , त्यांच्यावर मृत्यचे सावट ओढावले. इंदोर शहराच्या नजीक, खार्गोने जिल्ह्यातील त्यांच्या लष्करी छावणीमध्ये ते दिल्लीला स्वतःच्या नेतृत्वाखाली असलेल्या एक लाख सैन्य दलासह मार्गस्थ झालेले होते. नर्मदा नदीच्या तीरावर , सानवाड खार्गोने इथे २८ एप्रिल १७४० रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधीयांकडून त्यांचे स्मारक बांधण्यात आले. त्यांचे वास्तव्य असलेल्या वास्तूचे अवशेष आणि शिव मंदिर हि जवळच स्थापित केलेले आहेत.

बाजीराव मस्तानी भाग-7 मस्तानीची जीवनकथा

मस्तानी 

मस्तानी (१७०० - १७४०) या बाजीराव पेशवे पहिले मराठा सेनापती, मराठा साम्राज्यच्या चौथ्या मराठा छत्रपती ( साम्राज्य ) शाही जी राजे भोसले चे प्रधान मंत्री, यांच्या दुसर्या पत्नी होत्या. त्या एक  अतिशय सुंदर आणि शूर स्त्रीव्यक्तिमत्व होत्या असे म्हटले जाते.

पूर्व आयुष्य
मस्तानी या छत्रसाल महाराजांच्या कन्या म्हणून जन्माला आल्या. ऐकिवात कथेनुसार त्या छत्रसालांच्या दत्तक मुलगी होत्या.मध्य प्रदेश राज्यामध्ये , छत्रसाल जिल्ह्यापासून १५ किलोमेटेर दूर असलेल्या मौ सहनीय इथे त्यांचा जन्म झाला. धुबेला इथे आज इ मस्तानी  यांचा निवासी महाल आहे जिथे त्या नृत्य करत असत.

जीवनचरित्र 
बाजीराव पेशवे पहिले मस्तानिंशी निगडीत अनेक आख्यायिका आहेत. त्यांपैकी सर्वात जास्त माहितीत असणारी कथा म्हणजे त्या बुंदेल येथील राजपूत  नेते  छत्रसाल ( १६४९ - १७३१) जे कि बुंदेल खंड प्रांताच्या पन्ना संथानाचे संस्थापक होते , त्यांच्या  कन्या होत्या, ज्यांचा जन्म रुहानी बाई नामक अर्ध पर्शियन , हैदराबाद निझाम न्यायालयात असणाऱ्या नृत्यांगानेपासून झाला होता. जेंव्हा अलाहाबाद चे मुघल प्रमुख , मोहम्मद खान बंगश नि १७२७ - २८ मध्ये छत्रसाल वर आक्रमण केले , तेन्व्या चात्रासालांकडून बाजीराव पेशवे पहिले यांना मदतीच्या आशयाचा एक गुप्त संदेश धाडला गेला, त्यावेळी बाजीराव बुंदेल खंडांच्या परिसरामध्ये लष्करी मोहिमेवर होते. बाजीराव छत्रसालांच्या मदतीसाठी धावून आले. कृतज्ञते ची जान ठेवून  छत्रासालानी त्यांची कन्या मस्तानी सह आपल्या साम्राज्याचा तिसरा भाग , ज्यामध्ये झांसी , सागर आणि कल्पि चा हि समावेश होता , बाजीरावांना भेट केला. त्यांनी बाजीरावांना ३३ लाख सोन्याची नाणी देऊ केली. मस्तानी आणि बाजीरावांच्या लग्नामध्ये , काही गावांच्या नजराण्या बरोबर बाजीरावांना एक हिर्याची खान हि भेटी दाखल मिळाली.

असे असले तरी सुत्रानाम्ध्ये या बाबतीत तफावत आहे. छत्रासालांच्या दुसर्या दृष्टीकोनातून पाहिले असता त्या हैदराबाद निजामांच्या कन्या होत्या. १६९८ मध्ये निजामाचा छत्रसाल कडून पराभव झाला त्यावेळी निझामाच्या बायको कडून असा सल्ला मिळाला कि त्यांनी छत्रासालन च्या मुलीशी विवाह करावा जेणेकरून , त्या काळी मध्य भारतात प्रबळ साम्राज्य शक्ती बनलेल्या बुंदेला शी  सलोखा जपत येईल. आणि एका तिसर्या मूळ आख्यायिके नुसार , मस्तानी छत्रासालांच्या दरबारी नृत्यांगना  होत्या , बाजीराव आणि चात्रासाला यांच्या झालेल्या बैठकी नंतर  बाजीरावांनी छत्रासालांची मैत्री स्वीकारली त्यावेळी ते मस्तानी च्या प्रेमात पडले आणि त्यांनी त्यांच्याशी विवाह केला परंतु बाजीराव हे उच्च वर्णीय ब्राह्मण असल्या कारणाने तत्कालीन ब्राह्मण समाज आणि इतर हिंदू धर्मीय यांना हा विवाह मंजूर नव्हता..

तरीही , सर्वात जास्त स्वीकार्य कथेनुसार त्या छत्रासाल महाराजांच्या आणि त्यांच्या अर्ध पर्शियन मुस्लिम पत्नींच्या कन्या होत्या. मस्तानी चा सहसा उल्लेख बाजीरावांची प्रेमिका किंवा रखेल असाच केला जातो. असे असले तरी त्यांचा धार्मिक रीतीरिवाजांनी विवाह झालेला होता. घोडेस्वारी, भालाफेक आणि तलवारबाजी या युद्ध कलांमध्ये मस्तानी निपुण होत्या त्याच बरोबर त्या निष्णात गायिका आणि नृत्यांगणा होत्या. त्यांनी लष्करी मोहिमांमध्ये बाजीरावांना साथ दिलेली होती. काही महिन्यांच्या कालावधी मधेच बाजीरावांच्या पहिल्या पत्नी काशीबाई आणि मस्तानी या दोघींनीही बाजीरावांना मुलगे दिले. काशीबाईं च्या मुलावर फार लहानपणीच मृत्यू ओढावला. मस्तानी च्या मुलाचे नाव शमशेर बहादूर असे ठेवण्यात आले. 

बाजीरावांनी बंद च्या जहागीरीने शमशेर ( पेशवा ) ला सन्मानित केले. बाजीरावांच्या या मुलाने पानिपत च्या तिसर्या युद्धात , १७६१ मध्ये मराठ्यान कडून अहमद शह आणि अब्दाली यांच्या विरोधात युद्ध लढले , आणि असे म्हटले जाते कि या युद्ध मधेच तो मृत्युमुखी पडला.

बाजीरावांचे त्यांच्या अर्ध मुस्लिम असलेल्या पत्नी , मस्तानी साठीचे प्रेम त्यांच्या पहिल्या पत्नी काशीबाई यांच्याकडे दुर्लक्ष होण्यास कारणीभूत ठरत असलेल पाहून त्यांच्या आईंचा , राधा बाईंचा रोष बाजीरावांवर आला. राधा बाईंच्या आदाब खातीर बाजीरावांचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांनी मस्तानीला हद्दपार केले. बाजीरावांच्या मुलाने , बालाजी याने हि , मस्तानी ला त्यांच्या वडिलांना सोडण्य साठी जबरदस्ती करू पहिली पण मस्तानीने या हि गोष्टीला नकार दिला.  मस्तानिवारचा बाजीरावांचा वाढता प्रभाव आणि काशीबाई कडे झालेले दुर्लक्ष पाहून, बाजीराव लष्करी मोहिमे वर असताना , संतप्त बालाजीने ,मस्तानीला काही काळासाठी घरामध्ये नजरकैदेत ठेवले.

पुणे शहरामध्ये काही काळासाठी मस्तानी बाजीरावांसोबत त्यांच्या घरी राहिल्या. महालाच्या उत्तर - पूर्व दिशेला मस्तानी महाल होता आणि बाहेर जाण्यासाठी वेगळे असे बाह्य प्रवेशद्वार होते,  ज्याला मस्तानी दरवाजा म्हणून ओळखले जाते. घरातील आणि कुटुंबातील वाढता संताप पाहून , १७३४ मध्ये , शनिवार वाड्यापासून काही अंतरावर च कोथरूड मध्ये बाजीरावांनी मस्तानी साठी स्वंतत्र निवास स्थान  बांधून घेतले. आज हि ती विद्यमान वास्तू कोथरूड येथील मृत्युंजय मंदिर येथे आहे. कालांतराने महाल मोडण टाकण्यात आला आणि त्याचे अवशेष राजा केळकर संग्रहालय येथे स्वंतत्र विशेष भागामध्ये आज हि पहावयास मिळतात. कोर्ट नोंदींमध्ये ( बखर ) बाजीराव सरकारच्या दरम्यान  मस्तानीचे कोणतेही संदर्भ समाविष्ट करण्यात आले नाहीत. इतिहासकारांनी असे नमूद केले आहे कि राजा केळकर संग्रहालय मध्ये आणि वाई च्या संग्रहालय मध्ये असलेली मस्तानीची चित्रे हि अस्सल नाही आहेत.

मस्तानी या अत्यंत निष्णात घोडेस्वार आणि योद्धा होत्या असे मानले जाते. त्या बाजीरावांना दैनदिन न्यायालयीन कामांमध्ये हि साहाय्य करायच्या असे म्हटले जाते. स्थानिक लोकांच्या दंतकथेनुसार, पुणे - सासवड रस्त्यालगत दिवे गावाजवळ असणारे तळ्याला मस्तानीने गावातील लोकांची पाण्याची सोय भागवण्या करिता बांधकामासाठी अनुदान केले होते.

मृत्यू
एप्रिल १७४० मध्ये, जेंव्हा बाजीराव त्यांच्या खारघर येथील जमिनीची पाहणी करत होते तेंव्हा ते अचानक आजारी झाले आणि मृत्युमुखी  पडले. काशीबाई, चिमाजी आप्पा, बालाजी    (नानासाहेब ) आणि मस्तानी खारगाव येथे आले.रावर खेड येथे,  नर्मदा नदीच्या काठावर २८ एप्रिल १७४० रोजी बाजीरावांच्या मर्त्य अवशेषाला अग्नीस सुपूर्द करण्यास आले. पुण्या जवळ च्या पाबळ गावात मस्तानी हि त्यानंतर लवकरच  मरण पावली.

मृत्यूचे कारण
एका प्रसिद्ध अशा लोक आख्यायिके नुसार , बाजीरावांच्या मृत्यूची बातमी काळातच , मस्तानीने स्वतःच्या बोटात घातलेल्या अंगातीतील विष प्रश्न करून आत्महत्या केली असे म्हणतात. काहीजानाचे असे हि म्हणे आहे कि तिने नवर्याच्या जळत्या चीतेमध्ये उडी घेऊन , ती सती गेली. खरे कारण जाऊन घेण्यासाठी कोणत्या हि प्रकारचे दस्तऐवज उपलब्ध नाहीत. तरी, हि गोष्ट तर खरी आहे कि बाजीरावांच्या मृत्युनंतर मस्तानी फार काळ जगली नाही आणि १७४० मध्ये मरण पावली.

मस्तानीची समाधी
मस्तानी ची समाधी पाबळ येथे आहे. तिला मस्तानी ची समाधी असे ओळखले जाते. श्री मोहम्मद इनामदार हे त्या समाधीची देखरेख करतात. 

काशीबाई नि मस्तानी च्या सहा वर्षीय मुलाला शमशेर ला (ज्याला कृष्णराव म्हणून हि ओळखले जाते ) स्वतःसोबत घरी नेले आणि स्वतःच्या मुलांच्या बरोबरीने त्याचे हि पालन पोषण केले.

Wednesday, July 11, 2018

बाजीराव मस्तानी भाग-6

दिल्लीची हकालपट्टी 

१७३५ पर्यंत मराठ्यांनी संपूर्ण गुजरात आणि माळवा वर नियंत्रण मिळविले होते. पण काही स्थानिक मुघल अधिकारी आणि जमीनदार यांच्या  अमलाखाली असणाऱ्या शहरांनी आणि भागांनी मराठा नियंत्रणाला स्वीकारण्यास नकार दिला. मुघल सम्राट मुहम्मद शाह पण मराठ्यांना त्यांचा चौथाई आणि सरदेशमुखी चा हक्क देण्याच्या अधिकृत आदेशासाठी टाळाटाळ च करत होता. मुघल साम्राज्याचे लक्ष वेधून घेण्याच्या बाजीरावांच्या प्रयात्नानाही दुर्लक्षित करण्यात आले. मराठ्यांनी स्वतःचा अधिकार बजावण्याचे ठरविले आणि लगतच्या राजस्थान च्या प्रदेशांमध्ये लूट करण्यास सुरुवात केली. मुघलांनी हि त्यांच्या वजीर कमरुद्दीन खान आणि मीर बक्ष खान दौरन यांच्या नेतृत्वाखाली आपले सैन्य पाठवून प्रतिकार केला. पण दोघांचे हि सैन्य मराठा सेनापतींकडून मार्गस्थ झाले (वजीरांच्या सैन्याला पिलाजी जाधवांनी पिटाळून लावले आणि राणोजी शिंदे , मल्हारराव होळकर यांनी मीर बक्ष च्या सैन्याला पराभूत केले .).

पेशवानि मग मुघलांना आयुष्य भरासाठी धडा शिकविण्याचे ठरविले. डिसेंबर १७३७ मध्ये बाजीराव स्वतः दिल्ली कडे सैन्य घेऊन निघाले. त्यांनी सैन्याला दोन भागांमध्ये विभागले. एका सैन्य तुकडीचे बाजीरावांनी नेतृत्व केले तर दुसर्या सैन्य तुकडीचे नेतृत्व पिलाजी जाधवांनी आणि मल्हारराव होळकरांनी  केले. असे असले तरी होळकरांच्या सैन्य तुकडीला प्रंचड सैन्य घेऊन चाल करून आलेल्या ,आग्रा चा शासनकर्ता आणि औध चा नवाब , सदात खान कडून मात खावी लागली. मल्हारराव होळकरांनी कशीबशी सुटका करून घेतली आणि ते बाजीरावांच्या नेतृत्वाखाली असलेल्या तुकडीला येउन मिळाले. या दरम्यान मराठ्यांची दहशत संपली आहे असा विचार करून , सदात खानाने दिल्लीला चांगली बातमी कळविली. त्याला आकलन झालेल्या यशाच्या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी , दिल्ली ला अक्षरशः असंरक्षित करून इतर मुघल सेनापती हि सहभागी झाले .हीच ती वेळ होती, जेंव्हा बाजीरावांच्या सैन्याने जलद हालचालीने ,दहा दिवसांच्या प्रवासाला फ़क़्त अठ्ठेचाळीस तासांमध्ये संपवून , तळ ठोकून असलेल्या मुघल लष्कराला पूर्णपणे ओलांडले आणि दिल्लीच्या उपनगरामध्ये (२८ मार्च १७३७ ) पोहोचले.

या नंतर जे होते ते म्हणजे दिल्लीच्या उपनगरांमधील मिळालेली एकंदरीत लूट. मुघल सम्राटाने स्वतःला सुरक्षितपणे लाल किल्ल्यामध्ये कोंडून घेतले, जेंव्हा बाजीरावांनी आणि त्यांच्या माणसांनी मिळालेली लूट ग्रामीण भागामध्ये मोठय आनंदाने वाटून टाकली. आठ हजाराचे सामर्थ्यवान सैन्य घेऊन मीर हसन कोका ने बाजीरावांवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला पण ते निष्फळ पणे पराभूत झाले आणि मीर हसन स्वतः झालेल्या झटापटी मध्ये घायाळ झाला. आणि या नंतर मुख्य मुघल सैन्याने आपले बुद्धी कौशल्य एकत्रित करण्या पूर्वीच  बाजीराव आपल्या लवाजम्या सकट दख्खन ला परतले. ३१ मार्च १७३७ ला बाजीरावांच्या विजयी सैन्याने प्रंचड लुटी सह जखमी आणि लीन झालेल्या दिल्ली ला मागे सोडले. परतीच्या मार्गावर बाजीरावांनी आपल्या अनेक विश्वासू प्रतिनिधीना उत्तर आणि मध्य भारताच्या अनेक ठिकाणी वसविले जेणेकरून नजीकच्या भविष्यामध्ये तिथे त्यांचे कायमचे प्राभावाशाली वास्तव्य होईल.

बाजीराव मस्तानी भाग-5


सिद्दी सोबत हत्ती युद्ध 

मराठा आणि सिद्दी (अबेशिनिअन मुस्लिम ) यांच्या मधला संघर्ष पुन्हा वर आला जेंव्हा सिद्दी (अबेशिनिअन ) फौजदार, सिद्दी सत्त याने कोकणातील परशुरामाच्या हिंदू मंदिराची विटंबना केलि आणि ब्रम्हेंद्र स्वामी नामक संताचा अपमान केला.  सावनुर च्या नवाबांनी जंजिराच्या सिद्दी ला एक हत्ती भेट दिला जो मराठ्यांच्या प्रदेश हद्दीतून ब्रम्हेंद्र स्वामींच्या शिष्यांकडून वाहला जात असताना वाटेमध्ये  मराठा सरखेल कान्होजी आंग्रे (नौसेनापती) यांच्या सैन्याकडून पकडला गेला, हि घटना १७२९ मध्ये घडली.हे सगळे स्वामीचे कारस्थान असल्याचे गृहीत धरून सिद्दी फौजदारांनी स्वामी शिष्यांशी भांडण केले आणि परशुराम मंदिराची तोडफोड केली.ब्रम्हेंद्र स्वामी अतिशय श्रद्धाळू गृहस्थ होते आणि यामुळे मराठा आणि सिद्दी यांच्या ऐतहासिक नात्यामध्ये तणाव निर्माण झाला.  या दरम्यान सिद्दी नवाब,  रसूल याकूत १७३३ मध्ये मरण पावले आणि त्यांच्या मुलांमध्ये वारसाहक्काचे युद्ध सुरु झाले. कान्होजी आंग्रे हि ४ जुलै, १७२९ मध्ये मरण पावले आणि मराठा सरखेल म्हणून त्यांचा वारसा हक्क त्यांच्या मुलाकडे सेखोजी आंग्रे कडे गेला. बाजीरावांनी अनुकूल वेळ पाहून आपल्या सैन्याला पाठवले आणि समुद्रावरून जंजिरा ला वेढा घातला. किल्ला आता पडायच्या बेतात होताच, पण १७३३ मध्ये सेखोजी च्या झालेल्या अकाली मृत्युनंतर, सेखोजी च्या भावाने, संभाजीने पेशवा कडून आदेश घेण्यास नकार दिला आणि त्याच्या असहकाराच्या वर्तणुकीमुळे वेढा काढून घ्यावा लागला. मराठ्यांच्या सुदैवाने , सिद्दीचा मुलगा अब्दुल रहमान याने आपल्या काका आणि चुलत भावांसोबत वारसाहक्काच्या समझोत्यासाठी बाजीरावांना विनंती केली आणि ज्यायोगे मराठ्यांनी त्याला हवी ती मदत देऊ केली. या बदल्यात सिद्दीचे आधीचे प्रदेश, जसे कि रायगड, रेवस, चौल आणि थल हे मराठ्यांचे प्रदेश म्हणून ओळखले जाऊ लागले(1736). बाकीच्या भावांनी हि मराठ्यांशी प्रतिकार करणे व्यर्थ आहे हे मान्य करून हार पत्करली. त्यांची सत्ता मोठ्या प्रमाणात संपुष्टात आल्यामुळे सिद्दी त्या नंतर केवळ जंजिरा, अंजनवेल आणि गोवळकोट च्या प्रदेश साठीच मर्यादित राहिले. त्यामुळे आता हत्ती युद्ध या नावाने या घटनेची सांगता झाली.